सोलापूर बातमीपंढरपूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

माघवारीतील दुसरे गोल रिंगण कुरुल येथे उत्साहत संपन्न…

सोलापूर शहर व जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंडीचे एकत्रीकरण भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून करून प्रस्थान व रिंगण सोहळा सुरु केला आहे. माघ शुद्ध अष्टमीला दि. 05-02-2025 मंगळवार रोजी स. 9.00 वा. प्रदीप मोरे महाराज, मल्लिनाथ गट्टे, दगडू डोंगरे यांचे हस्ते पालखी पूजन केले आहे. वारकरी प्रथे प्रमाणे नित्य नियमाचे अभंग व भजन केले जाणार आहे. त्यावेळी जे उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज व पदाधिकारी यांचा हनुमान भजनी मंडळ कुरुल यांचे कडून सन्मान करण्यात आला. हा पालखी सोहळा ” ज्ञानोबा तुकाराम ” भजन करत पाटकर वस्ती मैदान, कुरुल ता. मोहोळ येथे पोहोचला आणि नंतर मान्यवर व ग्रामपंचायत कुरुल यांचे हस्ते अश्व पूजन केले व मान्यवरांचा सन्मान करून तदनंतर गोल रिंगण लाऊन घेतले, पहिले रिंगण ध्वजाधारी केले कारण दिंडीची सुरुवात पताकाने होते. तुळशी वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्या नंतर विणेकरी रिंगण केले. शेवटी अश्व रिंगण सुरु झाले आणि भाविकांच्या मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले . यामध्ये 23 दिंडी सहभागी झाल्या होत्या . ” पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थ व्रत || ” या न्यायाने वारकरी पंढरीला चालत जातात.
हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते . तसेच सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असून या सर्व कार्यक्रमासाठी जोतिराम चांगभले (प्रदेशअध्यक्ष ), सचिन गायकवाड ( उपाध्यक्ष ), तानाजी बेलेराव, सुरेश पोखरकर, गोरख शिंदे, ज्ञानेश्वर भोसले इ पदाधिकारी प्रमुख उपस्थित व……………
सर्व पदाधिकारीनी परिश्रम घेतले आहे .

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.