सोलापूर बातमी

सोलापुरात साप चावल्याने 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू…

दक्षिण सोलापुरातील औज आहेरवाडी येथे शेतात चालकत जात असताना साप चावल्याने 14 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास औज आहेरवाडी येथील रहिवासी श्रावणी अभय पाटील (वय १४) शेतात चालत जात असताना डाव्या पायास साप चावला. यामुळे ती बेशुद्ध पडली आणि चक्कर येऊन खाली पडली.

 

नातेवाईकांनी तात्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाही आज ९ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास श्रावणीचा मृत्यू झाला.

 

श्रावणी नुकतीच इयत्ता नवीची परीक्षा पास झाली होती आणि चालू शैक्षणिक वर्षात दहावीला प्रवेश करणार होती. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मागे आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa