solapurpoliceसोलापूर अपघातसोलापूर बातमी

सोलापूर : मार्केट यार्ड गेटसमोर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी गंभीर, पती व नात जखमी

सोलापूर : पत्नी व नातीसह दुचाकीवरून घरी जाणाऱ्या व्यक्तीच्या वाहनाला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने तिघे जण जखमी झाले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

दि. 7 जून 2026 रोजी रात्री 10.15 वा. च्या सुमारास हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड समोरील ॲग्रो गेटसमोर हा अपघात झाला. फिर्यादी म. अशपाक मकबुल बागवान (रा. बी ग्रुप 521, बिडी घरकुल, सोलापूर) हे दुचाकी क्र. एम एच 13 डी एफ 2466 वरून पत्नी व नात आयेशा यांच्यासह घरी जात होते.

 

त्याचवेळी आरोपी ट्रक चालक रविंदर परगत सिंग (रा. बिहार) याने ट्रक क्र. एम एच 26 ए डी 6767 हा हयगयीने व भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी किरकोळ जखमी झाले, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली तर नात आयेशा हिच्या पायास दुखापत झाली. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

 

याप्रकरणी दि. 8 जून 2026 रोजी सायं. 4.18 वा. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गु.र.नं. 504/2026 नुसार भा.न्याय संहिता कलम 281, 125(अ)(ब) सह मोवाकाक 177, 184 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

तपास पोहेकॉ/1378 वाघमारे (मो. 9325474528) करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
502 Bad Gateway

502 Bad Gateway


cloudflare