सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरात 1.80 कोटींचे कर्ज, वाढता आर्थिक ताण अन् एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत…

बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एका मुख्याध्यापकासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आर्थिक ताणतणाव आणि कर्जबाजारीपणाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील (वय अंदाजे ४० ते ४५), त्यांची पत्नी माधुरी पाटील (३७), तसेच मुलगे अथर्व पाटील (११) आणि शिवांश पाटील (९) यांचा मृत्यू झाला आहे. योगेश पाटील हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

प्राथमिक माहितीनुसार, शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे ते गेल्या काही काळापासून तणावाखाली होते. नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज आणि वाढता आर्थिक ताण यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा परिसरात आहे.

गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, एका सुशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबाचा अशा प्रकारे झालेला अंत समाजमनाला चटका लावणारा ठरला आहे. आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणाव यांचे गंभीर परिणाम किती भयावह असू शकतात, याची जाणीव करून देणारी ही घटना असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

(या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपास अहवालानंतरच घटनेमागील कारणांबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत.)

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found