solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूरमधून २५ वर्षीय तरुणी बेपत्ता; सोलापूर पोलिसांकडून शोध सुरू..!

सोलापूर (दि. १३ सप्टेंबर) – सोलापूर शहरातील सिद्धार्थ चौक परिसरातून एक तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार –

– पोलीस ठाणे – सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर शहर
– जावक क्र. – ११३८/२०२६, दि. १३/०९/२०२६
– गुन्हा रजि.नं. – ७६७/२०२६, बी.एन.एस. २०२३ कलम १४०(३) प्रमाणे
– तक्रारदार – लक्ष्मी नागनाथ वाघमारे (वय ५२, रा. सिद्धार्थ चौक, सोलापूर)
– बेपत्ता तरुणीचे नाव – वंदना नागनाथ वाघमारे (वय २५ वर्षे)

काय घडले?
फिर्यादी लक्ष्मी वाघमारे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी वंदना ही दि. १२/०९/२०२६ रोजी राहत्या घरातून निघून गेली आणि परत आली नाही. नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

कोणीतरी अज्ञात इसमाने तिला काहीतरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी तिच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले असल्याची खात्री झाल्याने फिर्यादीने तक्रार दिली आहे.

बेपत्ता तरुणीचे वर्णन –

– संपूर्ण नाव – वंदना नागनाथ वाघमारे
– रंग – सावळा
– उंची – अंदाजे ०४ फूट, ०२ इंच
– भाषा – मराठी, हिंदी, कन्नड बोलते
– अंगावरील पोशाख – पांढऱ्या रंगाचा टॉप त्यावर काळे टिकके व काळ्या रंगाची लेगिन्स व हिरव्या रंगाची ओढणी
– शिक्षण – सातवी पास
– केस – लांब असून वेणी घालते

सदर तरुणीबाबत कोणाला काहीही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क – पो.हे.कॉ. ११२ अमोल सुरवसे, सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर शहर. मो.नं. ८८८८८३७६३०

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel