solapurpoliceक्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर-*मरिआई चौकात टी-स्टॉलवरून वाद, बाप-लेकाला बेदम मारहाण करून ९ हजार लुटले; चौघांवर गुन्हा..!

सोलापूर-*मरिआई चौकात टी-स्टॉलवरून वाद, बाप-लेकाला बेदम मारहाण करून ९ हजार लुटले; चौघांवर गुन्हा*

*सोलापूर (दि. १५ सप्टेंबर) –* महाराष्ट्र टी स्टॉल, मरिआई चौक येथे रिक्षा चालकाला जाब विचारल्याच्या कारणावरून एका कुटुंबाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची आणि खिशातील ९ हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

*पोलीस वार्तापत्रानुसार –*

*पोलीस ठाणे –* फौजदार चावडी पोलीस ठाणे

*गु.र.नं. व कलम –* ७०५/२०२६, भा.न्या.संहिता कलम ११८(२), ११९(२), १९०, १९५(२), ३५२, ३५१(३), २८५, १८९(९) सह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ प्रमाणे

*घटना घडली –* दि. १४/०९/२०२६ रोजी दुपारी ०२.३० वा. सुमारास, महाराष्ट्र टी स्टॉल, मरिआई चौक, सोलापूर

*गुन्हा दाखल –* दि. १४/०९/२०२६ रोजी ००.३० वा.

*फिर्यादी –* राम नागनाथ पवार (वय ५२, रा. घर नं. ५६, दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर)

*आरोपी –* १) रिक्षा चालक (नाव माहित नाही), २) अक्षय लोकरे, ३) सोनू लोकरे, ४) शंकर सुरेवाड (सर्व रा. संघर्ष नगर, सोलापूर)

*नेमके काय घडले?*

फिर्यादी राम पवार हे त्यांचे मुले गौरव आणि निखिल यांच्यासह मोटारसायकलवरून जात असताना एका अनोळखी रिक्षा चालकाने त्यांची रिक्षा आडवी लावून रस्ता अडवला.

रस्ता अडवल्याचे विचारण्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने शिवीगाळ केली. त्याचवेळी तेथील स्टॉल मालक अक्षय धर्मा लोकरे व त्याचा भाऊ संकेत यांनीही शिवीगाळ करत “तुला माहित नाही का हा स्टॉल कुणाचा आहे, अरे मला व पुत्र्या गौरव पवार, निखील पवार असे आम्हाला म्हणत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली.”

आरोपींनी “यांना आज बचतोच, तुम्हाला आज सोडत नाही” असे म्हणून तिथे पडलेले दगड त्यांच्या हातामध्ये घेऊन जोरजोरात आरडाओरडा करत “कोणी आमच्या मध्ये आलात तर याद राखा, तुम्हे मुडदे पाडीन” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.

मारहाण करत असतानाच आरोपींनी गौरव याच्या खिशातील *९,०००/- रुपये* जबरदस्तीने काढून घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत..!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel