solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर – घरासमोरून 30 हजारांची स्प्लेंडर लंपास; विशाल नगरमधील घटना…

विशाल नगर, जुळे सोलापूर येथे राहत्या घरासमोर हँडल लॉक करून पार्क केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद शिवशंकर सदलगी (रा. 502 रॉयल क्राऊन अपार्टमेंट, विशाल नगर, जुळे सोलापूर) यांनी त्यांची काळ्या रंगाची व त्यावर लाल पट्टा असलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH 13 EB 3438 घरासमोर हँडल लॉक करून ठेवली होती.

दि. 5 जून 2026 ते दि. 8 जून 2026 या कालावधीत कधीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीने सदर दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवानंद सदलगी यांनी दि. 17 जून 2026 रोजी रात्री 11:42 वाजता विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत 30,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी गु.र.नं. 327/2026 भा. न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/ 1317 परदेशी (मो. 8669147576) हे करत आहेत.

राहत्या घरासमोरून दुचाकी चोरीस गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found