solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात परवानाविना वाळूची वाहतूक; 3 लाखांचा टिपर जप्त, चालकावर गुन्हा…

महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहित असतानाही अवैध वाळूची वाहतूक करताना सहा चाकी टाटा टिपर पकडण्यात आला आहे. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल देवीदास पाटील (रा. सिंधू विहार, जुळे सोलापूर) यांना दि. 17 जून 2026 रोजी दुपारी 5:05 वाजण्याच्या सुमारास अक्षत पाम, सोलापूर येथे एका टिपरमध्ये अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

तपासणी केली असता आरोपी चालक आप्पाशा लिंबण्णा ख्याडे (रा. मंदूप, ता. दक्षिण सोलापूर) हा टाटा कंपनीचा सहा चाकी टिपरमध्ये चार ब्रास वाळू भरून वाहतूक करताना मिळून आला. त्याच्याकडे महसूल विभागाचा कोणताही परवाना नव्हता.

या प्रकरणी 3,20,000 रुपये किमतीचा टिपर व वाळू जप्त करण्यात आली आहे. फिर्यादी सुनिल पाटील यांनी दि. 17 जून 2026 रोजी रात्री 7:31 वाजता सलगर वस्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार गु.र.नं. 207/2026 भा. न्याय संहिता कलम 303(2), सह खाण व खनिज अधि 1958 चे कलम 3,4,21 व पर्यावरण संरक्षण अधि 1986 चे कलम 9/15 प्रमाणे आरोपी चालक आप्पाशा ख्याडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/ 1314 उडाणशिव (मो. 9897921394) हे करत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found