सोलापूर : रिक्षा हटवण्यावरून वाद, चौघांनी लाकडी बांबूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…

भारत नगर, कुमठा नाका परिसरात सिमेंटची ट्रॉली आणल्याने रस्त्यातील रिक्षा हटवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून एका 43 वर्षीय व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी व लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
काय घडले?
दि. 31/05/2026 रोजी दुपारी 3.00 वाजता भारत नगर, कुमठा नाका येथे फिर्यादी युसुफ मोला मुल्ला, वय 43, रा. घर नं. 252 यांच्या घरासमोर सिमेंटची ट्रॉली आली होती.
वादाचे कारण
आरोपी समीर सिद्दीकी याची रस्त्यामध्ये लावलेली रिक्षा काढण्यास सांगितल्याने आरोपींचा राग अनावर झाला.
चौघांनी केली मारहाण
यानंतर आरोपी 1) समीर सिद्दीकी, 2) रजिया सिद्दीकी, 3) सम्मी सिद्दीकी, 4) जमीर सिद्दीकी, सर्व रा. भारत नगर यांनी शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीस व हातास मारहाण केली.
जखमी करून धमकी
मारहाणीत फिर्यादी युसुफ मुल्ला जखमी झाले आहेत. आरोपींनी “जिवे ठार मारण्याची व बांधकाम होऊ न देण्याची” धमकीही दिली आहे.
गुन्हा दाखल
सदर बझार पोलिसांनी भा.न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गु.र.नं 467/2026 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ/1277 काळे तपास करीत आहेत.
पोहेकॉ काळे – सदर बझार पोलिस ठाणे



