सोलापूर क्राईमsolapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये महिलेचे मंगळसूत्र लंपास, 40 हजारांचा ऐवज चोरीला…

रंगभवन, फर्स्ट चर्चच्या पाठीमागे असलेल्या आदर्श हॉस्पिटलच्या स्पेशल रूममधून अक्कलकोट येथील एका 67 वर्षीय रुग्णाच्या पत्नीच्या पर्समधील 40,500 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुठे व कधी घडली घटना?
दि. 15/05/2026 रोजी रात्री 10.00 वा. ते दि. 17/05/2026 रोजी सकाळी 6.45 वा. या दरम्यान आदर्श हॉस्पिटल, रंगभवन येथील स्पेशल रूममध्ये ही चोरी झाली.

काय चोरीला गेले?
फिर्यादी गणपत लालु राठोड, वय 67, रा. शिवाजी नगर, अक्कलकोट यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिच्या पर्समध्ये ठेवलेले खालील दागिने चोरीस गेले :
1. मंगळसूत्र : 30,000/- रुपये
2. सोन्याचे कानातील ऑप्स – दोन नग : 10,000/- रुपये
3. सोन्याची नाकातील नथ – एक नग : 500/- रुपये
एकूण नुकसान : 40,500/- रुपये

तक्रार दाखल
रुग्णालयात उपचार घेत असताना झालेल्या या चोरीप्रकरणी गणपत राठोड यांनी दि. 01/06/2026 रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल
पोलिसांनी भा.न्याय संहिता कलम 305 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं 466/2026 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ/417 चव्हाण – 9881497617 तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel