solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूर शहरात 15 दिवसांसाठी ड्रोन उडवण्यास बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश जारी…

सोलापूर, 1 जून 2026 : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि संभाव्य ड्रोन हल्ले रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात दि. 2 जून ते 16 जून 2026 या 15 दिवसांच्या कालावधीसाठी ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

काय आहे आदेश?
पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) अन्वये हा मनाई आदेश जारी केला आहे.

आदेशाचा कालावधी : दि. 02/06/2026 रोजी 00:01 वा. ते दि. 16/06/2026 रोजी 24:00 वा. पर्यंत.

का घेतला निर्णय?
1. असामाजिक तत्वांकडून ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रांचा (UAV) गैरवापर होण्याची शक्यता.
2. राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो.
3. सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता.

काय करता येणार नाही?
या कालावधीत सोलापूर शहर हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई आहे. यामध्ये ड्रोन प्रक्षेपण, छायाचित्रण व इतर कोणत्याही प्रकारे ड्रोन वापराचा समावेश आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांन्वये कारवाई करण्यात येईल.

सूचना : हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाणे, चौकी व महत्त्वाच्या ठिकाणी हा आदेश लावण्यात येणार आहे.

संपर्क : पोलिस आयुक्त कार्यालय, सोलापूर – 0217-2748405
Email ID : pisecurity.cpsol@mahapolice.gov.in

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel