सोलापूर रेल्वे स्टेशन येथे तरुणावर लोखंडी ह-त्या-रा-ने जीव-घे-णा ह-ल्ला, गळा चि-रू-न ह-त्या करण्याचा प्रयत्न.!

सोलापूर, दि. ११ –* सोलापूर रेल्वे स्टेशन परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटने हादरला आहे. स्टेशनच्या पार्किंगमधील सार्वजनिक बाथरूमजवळ एका तरुणावर अज्ञात हल्लेखोराने लोखंडी हत्याराने गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुन्ह्याचा तपशील –*
• पोलीस ठाणे: सदर बझार पोलीस ठाणे
• गु.र.नं व कलम:* ७५६/२०२६ – भा. न्या. संहिता कलम १०९(१) प्रमाणे
• *घटना घडली तारीख वेळ व ठिकाण:* दि. १०/०९/२०२६ रोजी सकाळी ०८.०० ते १०.०० वा. दरम्यान, रेल्वे स्टेशन जवळील मागील बाथरूम जवळ, सोलापूर
• गुन्हा दाखल तारीख वेळ:* दि. १०/०९/२०२६ रोजी २०.३८ वा.
• फिर्यादी:* विद्या अशोक माने, वय-३५ वर्षे, रा. नुर अपार्टमेंट बाजूला, ३ रा मजला, निर्मिती विहार, सोलापूर
• आरोपी:* अज्ञात इसम
नेमकं काय घडलं?*
फिर्यादी विद्या माने यांचा भाऊ *सागर अशोक माने* हे रेल्वे स्टेशन पार्किंग मधील सार्वजनिक बाथरूमच्या पाठीमागे असताना, अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने त्यांच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केला. आरोपीने सागर यांचा गळा चिरून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत…!



