solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर GM चौकातून हँडल लॉक असलेली स्प्लेंडर लंपास; 20 हजारांची बाईक चोरीला…

जी.एम. चौक, सोलापूर येथे हँडल लॉक करून पार्क केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंजुनाथ मल्लीनाथर गोविंदे (वय 20, रा. 67/5 सोना नगर, भवानी पेठ, सोलापूर) हे दि. 17 जून 2026 रोजी दुपारी 1:15 ते 2:10 वाजण्याच्या सुमारास जी.एम. चौक परिसरात गेले होते. त्यांनी त्यांची काळ्या रंगाची व त्यावर लाल पट्टा असलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH 13 CY 3194 हँडल लॉक करून उभी केली होती.

थोड्या वेळाने परत आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर आढळली नाही. अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने फिर्यादीच्या संमतीवाचून दुचाकी चोरून नेल्याची खात्री पटल्यावर मंजुनाथ गोविंदे यांनी दि. 17 जून 2026 रोजी रात्री 10:28 वाजता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत 20,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी गु.र.नं. 510/2026 भा. न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोह/1287 शेळके (मो. 8766978135) हे करत आहेत.

दिवसा-ढवळ्या गजबजलेल्या जी.एम. चौकातून दुचाकी चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)