सोलापूर क्राईम

सोलापुरातील जाकिर सय्यद यास खूनाच्या गुन्ह्यातून मिळाला जामीन

Ad.कादिर औटी यांचा युक्तिवाद ठरला महत्वाचा

सोलापूर (प्रतिनिधि):-  विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल क्रमांक ९९/२०२३ अन्वये भा.द.वी. कलम ३०२,३४ अंतर्गत तीन आरोपींविरुद्ध दिनांक १९/०२/२०२३ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खून प्रकरणातील आरोपी यांनी पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून विनाकारण यातील मयत इसम नामे आमिर खान याला डोक्यात बांबूने मारहाण केली होती व तसेच त्याला लाथा बुक्क्यांनी सुद्धा मारले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या भावाने व आईने मयत याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला विचारले असता त्यांनी घडलेली घटने बाबत घरच्यांना माहिती दिली होती व भांडणामुळे झालेल्या मारहाणीत मयत हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे ॲडमिट केले होते व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यातील आरोपी जाकीर सलीम सय्यद हा दिनांक २०/०२/२०२३ पासून अटक होता. आरोपीने आपला जामीन अर्ज *मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर* येथे दाखल केला होता. आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login