चूल पेटवताना वृद्ध महिला भाजून जखमी चुकीच्या माहितीने पोलिसांची झाली धावपळ

घरगुती भांडणात भावासोबत तक्रार झाल्याने रागाच्या भरात भावाने पेटवून दिल्याने ६५ वर्षीय महिला भाजून गंभीर जखमी झाली. ही घटना शहरातील रमाबाई आंबेडकर नगरात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र पोलिसांनी तिचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता चूल पेटवताना भाजल्याच्या जवाब जखमी महिलेने दिला आहे. वज्रेश्वरी विठ्ठल पवार (वय ६५ रा. रमाबाई आंबेडकर नगर) असे भाजलेल्या वृब्द महिलेचे नाव आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात हा प्रकार घडला होता. त्यांची भावजय (लक्ष्मी पवार) यांनी त्यांना भाजलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. राखी पौर्णिमेच्या दिवशी हा अनुचित प्रकार घडल्याने पोलिसांचे पथक त्वरित शासकीय रुग्णालय गाठले. आणि भाजलेल्या वज्रेश्वरी पवार यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी भावाने पेटविले नसून दुपारच्या सुमारास चूल पेटवताना आपण भाजल्याचा जबाब दिला. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.



