सोलापूर बातमीसोलापूर अपघातसोलापूर क्राईम

सदोष मनुष्यवध: ट्रक चालकाची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका…

सदोष मनुष्यवध प्रकरणी अटकेत असलेले ट्रकचालक राहुल नामदेव गायकवाड, रा- तुंगत , ता-पंढरपूर, जि- सोलापूर, यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपी राहुल गायकवाड याच्या विरोधात मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ६९२/२०२४, भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम १०५ व २८१ अंतर्गत दिनांक ०९/१०/२०२४ रोजी नोंदविण्यात आला होता. दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पेन्नुर टोलनाक्यावर काम करणारे कर्मचारी हनुमंत माने यांना आरोपीने भरधाव वेगाने ट्रक (MH 13 EF 3479) चालवत धडक दिली.टोलनाक्यावर न थांबता आणि टोल पावती न भरता, आरोपीने बॅरिकेट तोडून ट्रक पुढे नेला. मात्र, त्याने आपला ट्रक थांबवण्याचा किंवा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.टोल कर्मचारी हनुमंत माने यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने ट्रक भरधाव चालवत त्यांना जोरात धडक दिली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तातडीने टोलनाक्याच्या ॲम्बुलन्सने त्यांना पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली.या प्रकरणात आरोपीला सदोष मनुष्यवधाचा संभाव्य उद्देश असल्याचे जाणूनबुजून ट्रकचा वेग कमी केला नसल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि कलम २८१ (धोकादायक वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मोहिते यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला.या प्रकरणात आरोपीतर्फे, ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव भोंगे, ॲड. ओंकार फडतरे तर सरकारतर्फे ॲड. शैलजा क्यातम यांनी युक्तिवाद केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia