सोलापूर महापालिकेचा भ्रष्टाचार उघड… काय आहे प्रकरण पहा…

सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार श्रीकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आले आहे .घोंगडे वस्ती परिसरात असलेल्या अंडरग्राऊंड केबल घालण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्याने इनोव्हेशन इंजिनिअर अँन्ड काॅन्ट्रक्टर्स या मक्तेदारांची अनामत रक्कम जप्त करत त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आहेत.असं असतानाही पालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार श्रीकांत गायकवाड यांनी केला आहे.. पालिकेच्या हद्दीत शाब्दी नगर मध्ये बेकायदेशीर काम न करता रक्कम उचलण्यात आले तसेच घोंगडे वस्ती येथील विद्युत अंडरग्राऊंडचं काम ठेकेदारांन घेतलं असताना कुलमुख्तयार पत्र देऊन सबकान्ट्रक्ट कानडे यांना देऊन नियमभंग केला आहे.दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे कंपनीला काळ्या यादीत टाकून रक्कम जप्त करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे….
याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी तातडीने कारवाई करावी अशी विनंती गायकवाड यांनी केली आहे