महाराष्ट्रसोलापूर बातमी

अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून रस्त्यावर मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण…

क्कलकोट शहरात रविवारी (13 जुलै) दुपारी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते प्रवीण गायकवाड यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अक्कलकोटमध्ये आले असता, त्यांच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी काळं फासलं आणि रस्त्यावर उघडपणे मारहाण केली. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते प्रवीण गायकवाड

प्रवीण गायकवाड हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका सामाजिक कार्यक्रमासाठी अक्कलकोटमध्ये आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचताच, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

चेहऱ्यावर काळं फासलं, कारमधून ओढून रस्त्यावर मारहाण

गायकवाड हे गाडीमध्ये बसले असताना, शिवधर्म फाउंडेशनशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी त्यांची कार वेढून धरली. त्यानंतर त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं आणि त्यांना ओढून बाहेर काढलं. रस्त्यावर उघडपणे त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी उल्लेख’ आणि स्वामी समर्थांविषयी वादग्रस्त विधानांवरून संताप

प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तसेच, काही व्याख्यानांमध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी कथितरित्या अपमानकारक विधान केल्याचाही आक्षेप घेण्यात आला. याच कारणामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त; शहरात तणाव

या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, जमाव पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने या घटनेचा गंभीर दखल घेतला आहे.

पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, “या प्रकरणात संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

सामाजिक संघटनांची संतप्त प्रतिक्रिया

या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. काहींनी प्रवीण गायकवाड यांच्या विधानांचा निषेध करताना कायद्याच्या चौकटीत कारवाईची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला विरोध करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. त्यामुळे या प्रकरणाने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel