सोलापूर महानगरपालिका

सोलापुरात झाड कोसळल्याने 18 वर्षीय तरुण गंभीर जखमी…

सोलापूर, दि. 26 ऑगस्ट 2025: सोलापुरातील भवानी पेठ परिसरात घोंगडे वस्ती येथे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका दुर्दैवी घटनेत 18 वर्षीय रोहन श्रीनिवास गोसकोंडा हा तरुण झाड कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे.

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन नॅशनल लाँड्री दुकानाजवळ एका झाडाखाली चालत जात असताना अचानक झाड त्याच्या अंगावर कोसळले.

घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तातडीने ॲम्बुलन्स बोलावून रोहनला सोलापुरातील कुंभारी गावातील अश्विनी रुग्णालयात दाखल केले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर असल्याचे सांगितले आहे.

रोहनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून, वडील टीव्ही दुरुस्तीचे काम करतात, तर आई विडी कामगार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सोलापूर महापालिकेच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, या बाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login