सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. गौतम कांबळे, परीक्षा विभाग संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ललित कला व कला संकुलातील विद्यार्थिनी स्वप्नाली बीरुणगी आणि प्रतीक्षा कळमकर यांनी रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक व देखणे चित्र साकारले. त्यांच्या या कलाकृतीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करून समाज घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्रितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून करण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login