solapurpoliceसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात 52 लाखांसाठी छळ; पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा…

सोलापूर: लग्नानंतर संसारोपयोगी सामान, सोने-पैसे न देता, योग्य मानपान न करता किरकोळ कारणावरून अपमानित करून शिवीगाळ केल्याप्रकरणी 40 वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून 52 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत हाताने मारहाण करून घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी दुपारी 5.06 वा. ही फिर्याद दाखल झाली आहे.

फिर्यादी :श्वेता श्रीनू समरभं, वय 40 वर्षे, रा. 28/ए/18/14 मार्कंडेय सोसायटी, नवीन वालचंद कॉलेज समोर, सोलापूर

आरोपी

1. श्रीनू – पती

2. कांचना – सासू

3. पुरुषोत्तम – सासरा

4. स्वरूपा श्रीहीर चिटयाल रा. सोलापूर

गुन्ह्याचा कालावधी :सन 2010 ते 2026 पर्यंत, पद्मा नगर, सोलापूर येथे.

हकीकतीनुसार, वरील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस संसारोपयोगी सामान दिले नाही, सोने-पैसे दिले नाहीत, योग्य मानपान केला नाही. घरातील किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलून अपमानित केले व शिवीगाळ केली.

तसेच माहेरून *नवीन जागा खरेदी करण्यासाठी 52 लाख रुपये घेऊन ये* असे म्हणून हाताने मारहाण केली. पैसे न दिल्यास घटस्फोट देण्याची धमकी देऊन शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे गु.र.नं. 570/2026 नुसार भा.न्याय संहिता कलम 85, 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोहेकॉ/1385 घोडके (मो. 7972991972) करीत आहेत…

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa