solapurpoliceमनोरंजनसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर – जागा खरेदीसाठी माहेरून 4 लाख आण; नकार देताच विवाहितेचा छळ, पती-सासूवर गुन्हा

संसारोपयोगी सामान, सोने-पैसे दिले नाही, मानपान केला नाही, असा आरोप करत तसेच नवीन जागा खरेदीसाठी माहेरून चार लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लावण्या श्रीकांत कोळूर (रा. 104 सह्याद्री पार्क, सोलापूर) यांचा विवाह झाला असून एप्रिल 2024 ते दि. 7 मार्च 2026 या कालावधीत सासरी त्यांचा छळ करण्यात आला. आरोपी 1) पती श्रीकांत कोळूर, 2) सासू सुजाता (रा. साईबाबा चौक, गिता नगर, सोलापूर) यांनी फिर्यादीस घरातील किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलणे, चारित्र्यावर संशय घेणे, अपमानीत करून शिवीगाळ करणे असे प्रकार केले.

तसेच “नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून चार लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत हाताने मारहाण केली व घटस्फोट देण्याची धमकी देऊन शारीरिक-मानसिक त्रास दिला. अखेर लावण्या कोळूर यांनी दि. 17 जून 2026 रोजी रात्री 11:29 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी गु.र.नं. 516/2026 भा. न्याय संहिता कलम 85, 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे पती श्रीकांत व सासू सुजाता या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/ 745 डोके (मो. 9822813031) हे करत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found