सोलापूर महानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांसाठी कॅशलेस विमा योजनेला गती; स्वीकृत नगरसेवक केत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवकांना कॅशलेस आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्वीकृत नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश येताना दिसत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रक्रिया सुरू केली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेतील सर्व घटकांना कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आरोग्यावरील वाढता खर्च आणि अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय संकटांचा विचार करता अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केत यांनी हा विषय सातत्याने मांडला होता. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासनाने या मागणीला दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा केत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि कर्मचारी हितासाठी केलेल्या प्रयत्नांचा विजय मानला जात आहे. कर्मचारी व नगरसेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार असून, सामाजिक बांधिलकी जपत केत यांनी पुन्हा एकदा कर्मचारी हिताचा मुद्दा प्रभावीपणे पुढे आणल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

कर्मचारी, अधिकारी आणि नगरसेवकांच्या आरोग्य संरक्षणासाठी राबविण्यात येणारी ही कॅशलेस विमा योजना प्रत्यक्षात आल्यास ती सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि लोकहितकारी निर्णय ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found