solapurpoliceसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; 34 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक…

सोलापुरात 34 ग्रॅम एमडी (Mephedrone) जप्त; ₹6.80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

सोलापूर, दि. 30 जुलै : सोलापूर शहरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 34 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 6 लाख 80 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्त घालत असताना छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ, जुना पुणा नाका परिसरात एक संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली.

पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळून आली.

जप्त करण्यात आलेली पावडर तात्काळ पोलीस आयुक्तालयातील फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली. रासायनिक तपासणीत ती मेफेड्रोन (एमडी) हा प्रतिबंधित अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश प्रदीप शखरे (वय 34), रा. घर क्र. 52, मित्रनगर, शेलगी, सोलापूर असे आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हा अमली पदार्थ सोलापूर शहरात विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 95/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक विजय बनसोडे तसेच पोलीस अंमलदार बापू साठे, यशराज गायकवाड, सुभाष मुंढे, संदीप सखरे, रामेश्वर सावरे, धीरज सातपुते, अभिजीत पवार, शंकर पाटील, बाबू काळे आणि मितेश राऊत यांनी सहभाग घेतला.

शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली असून, अशा अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सोलापूर शहर पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.