solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर – दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने उचलून नेले, बेल्टने मारहाण करून लुटले..!

सोलापूर, दि. ०१ सप्टेंबर –* हॉटेल गुलमोहरजवळ फोनवर बोलत रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने उचलून नेले आणि पुणे बायपास रोडवर घेऊन जाऊन बेल्टने मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याची माहिती 

गु.र.नं. व कलम :* ५०९/२०२६ – भा.न्या.संहिता कलम ३०९(४), १३८, ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे

 घटनेची वेळ व ठिकाण :* दि. ०९/०८/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा. हॉटेल गुलमोहर, सोलापूर

गुन्हा दाखल :* दि. ०१/०९/२०२६ रोजी रात्री २०.४६ वा.

 फिर्यादी :* संजीवकुमार परमेश्वर जावळकोटी, रा. क/३७ जाईजुई नगर, विजापूर रोड, सोलापूर

गेला माल :* ७८,५००/- रुपयांचा मुद्देमाल

– वनप्लस कंपनीचा मोबाईल

– रोख रक्कम

– एसबीआय एटीएम कार्ड

*नेमके काय घडले?*

फिर्यादी संजीवकुमार जावळकोटी हे हॉटेल गुलमोहर जवळ फोनवर बोलत रस्ता ओलांडत असताना अचानक मागून नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी फिर्यादीच्या शर्टच्या वरील खिशातून मोबाईल काढून घेतला आणि त्यांना जबरदस्तीने गाडीवर बसवून पुणे बायपास रोडवर घेऊन गेले.

तेथे हाताने आणि बेल्टने बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातील एटीएम कार्ड व रोख रक्कम काढून घेतली. एवढेच नाही तर एटीएम कार्डचा पिन जबरदस्तीने विचारून घेऊन, कार्डचा वापर करून खात्यावरील रक्कम खर्च केल्याचेही समोर आले आहे.

याबाबत विजापूर नाका पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करीत आहेत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel