सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापुरात किरकोळ कारणावरून राडा..!

सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहुल विराजदार, प्रेम कतारी, शंकर कतारी आणि संजय कतारी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहित नंदकुमार राऊत, रा. मडी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर हे नमूद ठिकाणी बोलत असताना आरोपी राहुल विराजदार याने त्यांच्याशी विनाकारण शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपी प्रेम कतारी यानेही फिर्यादीला शिवीगाळ करून हातातील कट्याने कपाळावर मारल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. आरोपी शंकर कतारी याने खाली पडलेली लोखंडी वस्तू उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६६८/२०२६ अन्वये करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel