सोलापूर – पार्क स्टेडियमवर गर्दीचा फायदा घेऊन १५ हजाराचा मोबाईल लंपास!

सोलापूर : पार्क चौक परिसरातील पार्क स्टेडियमवर बसलेल्या महिलेचा मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने फौजदार चावडी हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ७८०/२०२६
भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा.
फिर्यादी :- रुचिता बालाजी येदुर, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर
आरोपी :- अज्ञात चोरटा
गेला माल :- १५,०००/- रु. चा काळसर हिरवा रियलमी ७ मोबाईल
हकीकत अशी की –
दि. २०/१०/२०२६ रोजी सायंकाळी १८.३० वा. चे सुमारास, पार्क चौक, सोलापूर येथील पार्क स्टेडियम येथे फिर्यादी बसले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन जवळ ठेवलेला फिर्यादीचा मोबाईल फिर्यादीचे संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेला आहे.
स्टेडियमसारख्या गजबजलेल्या ठिकाणी महिलांच्या हातातील मोबाईल चोरीला जाणे म्हणजे चोरट्यांना कसलीच भीती राहिली नाही हेच दिसून येते. पोलिसांनी गस्त वाढवून या चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.
तपास :- पोहकॉ/ ११८६ घुगे- हे करीत आहेत.



