सोलापूर – हुंड्यासाठी विवाहितेचा छळ – सासरच्या 7 जणांकडून मारहाण, शिवीगाळ, माहेरून 13 लाखांची मागणी!

सोलापूर : माहेरून १३ लाख रुपये हाकलून आण म्हणून पतीसह सासरच्या सात जणांनी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
सदर बझार पोलीस ठाणे – गु.र.नं. ९०८/२०२६
भा. न्या. सं. कलम ८५, ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा.
फिर्यादी :- आशा गौतम डांगे, रा. सिध्दार्थ नगर, सोलापूर
आरोपी :- १) गौतम डांगे- पती, २) राजु- दिर, ३) शितल- जावु, ४) लता- नणंद, ५) संजय- दिर, ६) अर्चना- जावु, ७) मंगल- नणंद, रा. कुमठा नाका, सोलापूर
हकीकत अशी की –
ऑगस्ट २०२३ ते दि. १८/०८/२०२६ रोजी चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी, वरील नमुद आरोपीत मजकूर यांनी मिळून फिर्यादीस हाताने मारहाण व शिवीगाळ करून फिर्यादीस मानसिक व शारीरिक त्रास दिला तसेच माहेरी हाकलून देवून १३ लाख रुपये घेवून ये असे तगादा लावला आहे म्हणून.
लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडूनच पैशासाठी विवाहितेला मारहाण आणि हाकलून देण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असून या नराधम सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तपास :- पोहेकॉ/ १२७७ काळे- हे करीत आहेत.



