सोलापूर – चाटी गल्लीतून २० हजाराची हिरो मोटारसायकल लंपास, ए वन इलेक्ट्रिक दुकानासमोरून हात साफ!

सोलापूर : जोडभावी पेठ हद्दीतील चाटी गल्लीतून दुचाकी चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने ए वन इलेक्ट्रिक दुकानासमोर लावलेली मोटारसायकल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे – गु.र.नं. ८०३/२०२६
भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा.
फिर्यादी :- सोमनाथ विठोबा पांढरे, रा. ४९/८३, भवानी पेठ, सोलापूर
आरोपी :- अज्ञात चोरटा
गेला माल :- २०,०००/- रु काळे रंगाची हिरो एच एफ डिलक्स मोटार सायकल क्रं. एम एच १४ सी वाय ३७५७
हकीकत अशी की –
दि. १९/१०/२०२६ रोजी १७.०० ते २१.४५ वा चे दरम्यान, चाटी गल्ली, सोलापूर येथे, फिर्यादीची वरील वर्णनाची व किंमतीची मोटार सायकल ए वन इलेक्ट्रिक दुकानासमोर लावली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून, मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून.
दिवसाढवळ्या गजबजलेल्या चाटी गल्लीतून गाडी चोरीला जाणे म्हणजे चोरट्यांना पोलिसांची भीतीच उरली नाही हे स्पष्ट होते. पोलिसांनी तात्काळ या चोरट्याचा शोध घेऊन गाडी हस्तगत करावी अशी मागणी होत आहे.
तपास :- पोहेकॉ/ १३७४ सरतापे- ९८२३४३९३७४ हे करीत आहेत.



