सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सायंकाळी शोकसभेचे आयोजन…!

राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र अनेक ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने रविवार दि १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ .३० वाजता स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार हे तळागाळातील नेते होते. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक मेहनती व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे…

या शोकसभेला सर्वपक्षीय नेते,खासदार, आमदार, नगरसेवक,कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर – जिल्हाध्यक्ष महेश गादेकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login