महाराष्ट्र

४ फूट लांबीचा म्हांडूळ प्रजातीचा साप रेस्क्यू करून वनविभागाकडे सुपूर्त

वारजे मधील आदित्य गार्डन सिटीच्या मागे असलेल्या लिबेरो सोसायटी मधून अक्षय सावंत यांचा परवा रात्री फोन आला. त्यांचा फोन ठेवतो न ठेवतो लगेच जुना मित्र असलेल्या चिन्मय माडगूळकरचा फोन आला आणि म्हणाला ‘पॅडी आमच्या तिथे साप निघाला आहे’ विचारपूस केली तर समजले म्हांडूळ आहे म्हणून. मी त्यावेळी पाषाण मध्ये होतो.
पाऊस पण बऱ्यापैकी पडत होता. त्यामुळे शंभूराजेची फोर व्हीलर घेतली आणि पाषाण कडून वारजेला निघालो. सोबतच तिथे उपस्थित असलेल्या अक्षय सावंत यांना सापावर लक्ष ठेवायला सांगितले. मला फोनवर साप दोन फुटाचा आहे असे सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र तो त्यापेक्षा दुप्पट मोठा होता. एवढा मोठा म्हांडूळ प्रजातीचा साप मिळणे ही मोठी गोष्ट आहे.

सापाला एका कापडी पिशवीत रेस्क्यू केले आणि लगेच वरिष्ठ वनप्रतिबंधक अधिकारी विद्याधर गांधीले साहेबांना फोन करून याची माहिती दिली. त्यांनी उद्या दुपारी ३ वाजता रेस्क्यू कडे सुपूर्त करू असे सांगितले. त्याप्रमाणे काल विद्याधर गांधीले साहेब यांच्या उपस्थितीत रेक्यु टीम कडे सापाला सुपूर्त करण्यात आले. यावेळी आलम पठाण भाई, अभिजीत राव पायगुडे आणि रेस्क्यू टीमचे डॉ.चेतन वंजारी उपस्थित होते.

म्हांडूळ या सापा बाबत बऱ्याच अंधश्रद्धा समाजात आहेत. हा साप बाळगल्याने धनलाभ होतो वगैरे या सर्व गोष्टी खोट्या आहेत. उलट हा साप जर तुम्ही बाळगला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊन तुम्हाला ‘जेल लाभ’ होऊ शकतो आणि या सर्व गोष्टी करता करता तुमचा ‘धन लॉस’ होण्याची पूर्ण खात्री देशाचे कायदे तुम्हाला देतात. पण कायदे असो किंवा नसो आपल्या वैयक्तिक स्वार्थ आणि अंधश्रद्धेसाठी या प्राण्यांना त्रास देणे सर्वथा चुकीचे राहील.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)