न्यायालय निर्णयसोलापूर बातमी

जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी राहुल मुकुंद बनसोडे( रा.टाकळी सिकंदर ता. मोहोळ) याचे विरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -९७२/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता चे कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी राहुल बनसोडे याने जमिनीच्या वादावरून मागील राग मनात धरून फिर्यादी (शुभांगी शिखरे) यांच्या घरासमोर अचानकपणे येऊन मुलगा श्रेयश याच्या डोक्यात व मानेवर सत्तुर(कोयत्याने) २ वार केले होते तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीने श्रेयस यास सदर हल्ल्यात गंभीर जखमी केले होते. त्यानंतर फिर्यादने मुलाला वाचविण्यासाठी गेले असता तिच्यावर देखील आरोपीने सत्तूरने हातावर व डोक्यावर वार करून गंभीर स्वरूपात जखमी केले होते.सदरचा प्रकार चालू असता फिर्यादीचे पति नागेश तिथे आले असता त्यांना देखील धमकावण्याचे काम आरोपीने केले होते, तसेच सदर फिर्यादीस व त्यांच्या मुलास त्यांच्या नातेवाईकांनी प्रथमतः ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता तेथून त्यांना पुढील उपचारासाठी लाईफकेअर हॉस्पीटल मोहोळ येथे ऍडमिट केले होते.
तद्नंतर फिर्यादीने मोहोळ पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती. अटकेनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपी तर्फे ॲड. कदीर औटी, ॲड.दत्तात्रय कापूरे, ॲड.वैभव बोंगे यांनी काम पाहिले तर सरकार तर्फे श्रीमती.आर.जे. बुजरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia