सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरात विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सोलापूर : विवाहित महिलेकडून घर दुरुस्तीचा खर्च व कर्ज फेडण्यासाठी तब्बल ८ लाख रुपये घेऊन, नवीन प्लॉट घेण्यासाठी पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाहिन अकबर मकानदार (रा. मदनी नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २० मे २०२२ ते १६ जून २०२५ या कालावधीत बदलापूर (ठाणे) येथील ऋतु वर्ल्ड कॉम्प्लेक्स परिसरात हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अकबर मकानदार, दौलबी मकानदार, चांदसब मकानदार, फरजाना शेख आणि यास्मीन पटेल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस वेळोवेळी घर दुरुस्ती व कर्ज फेडण्यासाठी ८ लाख रुपये आणण्यास भाग पाडले. तसेच सोलापुरात नवीन प्लॉट घेण्यासाठी पैशांची मागणी करत शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. विजापूर नाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia