सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

शिक्षक व कर्मचाऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडू– आरोग्य दूत मंगेश चिवटे

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जाईल. अशा उद्धट, बेफाम अन्यायकर्त्या अधिकाऱ्यांना शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या दरबारात खेचू ,असा खणखणीत इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी दिला. ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित ग्रंथ प्रकाशन आणि सत्कार करतेवेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले की राज्यातील गंभीर रुग्णांना जीवदान देण्याबरोबरच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवेला संरक्षण ,पदोन्नतीला आरक्षण देण्याचे काम मी करणार आहे. त्यासाठी मला विधान परिषदेत पाठवा असेही ते म्हणाले.

अध्यक्ष पदावरून बोलताना समाजभूषण भालशंकर म्हणाले की प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी आपले उभे आयुष्य शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रासाठी वाहिले. त्यांचा उचित सन्मान करण्यासाठीच “ज्ञांमंदिरातील प्रज्ञावंत” या गौरव ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचार्य गायकवाड हे सेवेतून निवृत्त झाले असले तरी महासंघासाठी त्यांचं कार्य अविरत सुरू राहील असेही ते म्हणाले .
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य गायकवाड म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ आणि बहुजन शिक्षक महासंघ यांच्यामुळेच मी घडलो. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन .संघटनेच्या कार्यात अविरत कार्यरत राहील.
या कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव चौगुले ,माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सदस्य डॉ. बापूसाहेब अडसूळ, बसव व्याख्याते रविकांत गोरे, दत्तात्रय शिंदे, रामण्णा गायकवाड आदींनी आपले विचार मांडले. यानंतर सिद्राम मुली यांनी अभंग गायन केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्राचार्य गायकवाड यांच्या कार्यावर आधारित “ज्ञान मंदिरातील प्रज्ञावंत” या गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सेक्रेटरी समाजभूषण रवी देवकर यांनी केले. प्रा. युवराज भोसले यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर निर्मला मौळे यांनी आभार मानले. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे उपप्राचार्य प्रा. प्रकाश शिंदे राज्यकोषाध्यक्ष निलकंठ शिंगे, रिपाईचे नेते श्यामसुंदर गायकवाड ,प्राचार्य शरद सावंत, भीमराव डोंगरे , गंगाधर शिवशरण,मल्लिकार्जुन कांबळे शोभा चंदनशिवे, प्रज्योत नवघरे, हर्षवर्धन गडहिरे, अविनाश भालशंकर आदी उपस्थित होते. याच समारंभात संघटनेचे पदाधिकारी शाळेतून निवृत्त झाले आहेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, राजकुमार वसेकर,अण्णा गवळी यांचा समावेश होता.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia