सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

नालंदा नगर बुद्ध विहार येथे नूतन नगरसेवक यांचा सत्कार संपन्न…

सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे नूतन नगरसेवक/ नगरसेविका यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे हे होते तर प्रमुख पाहणे म्हणून समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर है उपस्थित होते….
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रभाग १ चे नगरसेवक गौतम कसबे, प्रभाग ४ च्या नगरसेविका वंदना ताई गायकवाड, प्रभाग २३ चे नगरसेवक सत्यजित वाघमोडे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आरती वाकसे व राजशेखर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व नगरसेवक यांनी नगरातील विकास कामावर लक्ष देऊन नगराचा तसेच सोलापूरचा सर्वांगीन विकास करू असे आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, अण्णासाहेब भालशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वसदर कार्यक्रमास विजयकुमार क्षीरसागर, नागोराव कांबळे, प्रा.शहाजी मादाळे सर, उत्तम भालेकर, सिद्धार्थ सिद्धगणे, सुशीलादेवी भालशंकर, आम्रपाली गाडे, मंजुश्री खंडागळे, सुरेखा वाघमारे, रुक्मिणी खंडागळे, सुषमा माने, राजश्री वाघमारे, वनमाला गायकवाड, बबिता बाबरे आदी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिलचंद्र भालशंकर, कपिल क्षीरसागर, अमित सूर्यवंशी, सुमित चलवादी, चंद्रमनी वाघमारे, अशोक प्रधान, रणजीत काटे, अश्वजित दुपारगुडे, अक्षय किरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel