सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

अहिल्यादेवींनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

सोलापूर विद्यापीठात जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर व वृक्षारोपण...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ कुशल प्रशासक नव्हत्या, तर प्रजा हितासाठी सदैव तत्पर असलेल्या रणरागिणी होत्या. तीनशे वर्षांपूर्वीच त्यांनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले आणि महिला सक्षमीकरणाचे धडे दिले, असे प्रतिपादन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. जयकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पिंक रिव्हलेशनचे डॉ. श्रद्धा जवंजाळ व डॉ. राहुल जवंजाळ, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मुकुंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी केले.

डॉ. जयकर म्हणाले, अहिल्यादेवींना सासरे मल्हारराव होळकर यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. त्यांनी भगवान शिवाचे स्मरण ठेवून न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकारभार केला. आज ही त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळते असे, त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या सुविधा यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. तसेच, रक्तदानासाठी विविध शासकीय व निमशासकीय संस्थांनी वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.

‘आरोग्य उत्तम तरच सर्व उत्तम’ – कुलगुरू डॉ. महानवर
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांसह आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे. आरोग्य चांगले असेल तरच इतर सर्व गोष्टी सुरळीत पार पडतात. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, तसेच आपल्या आई-वडिलांची आदराने काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

पिंक रिव्हलेशनचा उपयुक्त सामंजस्य करार
डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या, “विद्यापीठ आणि पिंक रिव्हलेशन यांच्यात झालेल्या करारामुळे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसविषयक जनजागृती उपक्रमांना गती मिळेल. महिलांसोबत पुरुषांनीही आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, वित्त व लेखा अधीकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभाग संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार डॉ. मुकुंद माळी यांनी मानले.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित वृक्षारोपण व आरोग्य शिबिरप्रसंगी अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. राहुल जवंजाळ, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. अभिजित जगताप, संचालक डॉ. केदारनाथ काळवणे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel