राजकीय

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार – शरद पवार

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपवर नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

देशभरात भाजपची घसरण सुरू आहे, केवळ 5 ते 7 राज्यात भाजपची सत्ता आहे. असे सांगतानाच सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत मोठी जबाबदारी घेणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोलिसांचा वापर करणे चुकीचे

दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारीचा उद्योग सुरू असताना तयावर या प्रकल्पाचा जर फटका बसणार असेल तर हे योग्य नाही. पोलिस बळाचा वापर करुन जर काम करुण घेतले जात असतील तर लोक त्यांसाठी पाठिंबा देणार नाही. लोकांना योग्य मोबदला दिला, चर्चा केली तर त्यातून मार्ग निघू शकेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

सुळेंवर मोठी जबाबदारी नाही

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही मोठी जबाबदारी स्वीकारण्याची नाही. सध्या त्याचे ध्येय लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. नीतेश राणेंवर बोलण्यास मात्र, शरद पवारांनी बोलणे टाळले आहे.

सरकारवर हल्लाबोल

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात अवकाळी आणि गारपीट यांच्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून अद्याप मदत करण्यात आली नाही, असे म्हणत पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मविआम्हणून निवडणूक लढणार

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. म्हणून लवकरात लवकर लोकसभेच्या जागेचे वाटप होणे गरजेचे आहे. जेणेकरुण उमेदवारांना आणि पक्षांना मतदारसंघात काम करायला संधी आणि वेळ मिळू शकेल असे मत पवारांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel