महाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

चित्रकलेच्या माध्यमातून उत्साहात साजरी केली शाहू महाराज यांची जयंती

तब्बल ६५० स्पर्धकांनी नोंदविला आपला सहभाग; उपमहापौरांकडून उपक्रमाचे कौतुक

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ७ केंद्रावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल६५० स्पर्धकांनी आपल्या सहभाग नोंदविला.सोलापुरात प्रथमच इतक्या मोठ्या उत्साहात शाहू महाराज यांची जयंती साजरी होत असल्याचे बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक २८ आणि नालंदा बुद्ध विहार विजापूर रोड सोलापूर येथील परीक्षा केंद्रावर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. शाहू महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचणे गरजेचे असून अशा स्पर्धांमधून शाहू महाराज यांची ओळख लहान मुलांना होत असल्याचे उपमहापौर देवकर म्हणाल्या.लहान मुलांपासून ते पालकांपर्यंत विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे,परमेश्वर सुतार,सत्यवान पाचकुडवे,विनोद वर,अविनाश भालशंकर, एकनाथ रिकिबे,बी. एन. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)