महाराष्ट्रराजकीय

ठाण्याचे पोलिस नाशिकमध्ये दाखल:संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, श्रीकांत शिंदेंवर केलेल्या आरोपांवर जबाब नोंदवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज ठाण्याचे पोलिस नाशिकमध्ये पोहोचले आहेत. संजय राऊत यांचा जबाब पोलिस नोंदवणार आहेत.

संजय राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ठाणे पोलिस संजय राऊत यांचा जबाब घेण्यासाठी नाशिकला पोहोचले आहेत. ठाण्याच्या एसीपींसह 6 जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचले आहे. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे.

काय आहेत राऊत यांचे आरोप?

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवली, असा आरोप काल केला. राऊत म्हणाले, लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्या हत्येची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे यांच्यावर हे आरोप केले आहेत.

सुरक्षेत अशी वाढ

संजय राऊत यांनी काल केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जय राऊत यांच्यासोबत 3 पोलिस कर्मचारी आणि एक वाहन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या रूमच्या बाहेरही पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.

राऊतांच्या पत्रात काय?

  • खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, जय महाराष्ट्र! गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही.
  • महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
  • ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia