न्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर बातमी

पत्नीस जीवे मारण्याचे उद्देशाने विष दिल्या प्रकरणी आरोपीस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर._

वरील प्रकरणात दिनांक १७/०३/२०२२ रोजी सलगर वस्ती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक ४४/२०२२ अन्वये भा.द.वि कलम ३२८, ३२४, ४९८-अ, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे आरोपी आदम मुल्ला व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादी ही इंचगिरी (ता इंडी- जि. विजापूर) येथे आपल्या पतीसोबत लग्नानंतर रहावयास होती. फिर्यादीचे पती व आई-वडील, हे फिर्यादीस लग्न झाल्यापासून वारंवार हुंड्या बद्दल तगादा लावत असत आणि फिर्यादीस शिवीगाळ करून जाणीवपूर्वक त्रास देत असत. पतीच्या ट्रॅक्टर च्या व्यवसायासाठी देखील २०००००/- रुपयाची रक्कम परिवारांना बँकेच्या हप्ते फेडण्यासाठी स्वीकारली होती. त्यानंतर देखील पती व त्यांच्या घरातील लोकांनी फिर्यादीच्या कडून सोन्याची मागणी तसेच मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असा जाच हक्क त्रास देत होते. आरोपीने फिर्यादीस शेळ्यांच्या अंगावरील गोचीड मारायचे पातळ औषध ग्लास मधून पाजले होते व तदनंतर पतीच्या घरातील एकाही व्यक्तीने अशा प्रसंगी तिला दवाखान्यात घेऊन गेले नव्हते, परंतु सुदैवाने फिर्यादी या कठीण प्रसंगात बचावली होती. आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती श्री. माधव जामदार यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे _ॲड.कदीर औटी,ॲड. आकाश कवडे, ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.