सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

पत्रकार गोंजारींवरील गुन्ह्याविरोधात पत्रकार संघटना आक्रमक…

पोलीस आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सात दिवसांत गुन्हा मागे घेण्याची मागणी...

सोलापूर : एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा सात दिवसांत मागे घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले असून, संबंधित प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पत्रकाराला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकारिता करताना वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांवर दबाव आणणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हा चिंतेचा विषय असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष नगरसेवक
मनीष केत आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघाचे खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख , मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष तात्या लांडगे, अरुण रोटे, अनिल कदम, चंद्रकांत मिराखोर, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, प्रीतम पंडित, विश्वभूषण लिमये, आयुब कागदी, वसीम आत्तार, संदीप वाडेकर,
विनोद हुमनाबादकर,विजय आवटे, राकेश कदम, उमेश कदम, अंबादास पोळ, आप्पासाहेब पाटील, इम्रान सगरी ,
सचिन जाधव, महेश हाणमे, मकरंद ढोबळे, यासीन शेख,हुजेब इनामदार,संतोष कासे,विक्रांत कालेकर,दत्ता केरे,साकिब शेख, तौसिफ़ शेख, राजू बंडगर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना एकवटल्या आहेत. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकारांविरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करताना संबंधित पत्रकारितेचा संदर्भ, बातमीमागील वस्तुस्थिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला जावा, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी
स्वतंत्र यंत्रणा हवी : खेलबुडे

पत्रकार कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दबाव आणणे अथवा गुन्हे दाखल होणे ही गंभीर बाब आहे. पत्रकारांना अशा प्रकारच्या अन्यायापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केली. पुण्यात पत्रकारांबाबत घडलेल्या घटनेचाही त्यांनी निषेध केला.

सात दिवसांत निर्णय घ्या : केत

मंदार गोंजारी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सात दिवसांच्या आत मागे घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांनी दिला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel