सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक

पाणी नको विष द्या पाणी नको विषद्या कुचन नगर भागातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन

सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरात आज पाणीपुरवठा झाला परंतु त्या पाणीपुरवठ्यात महिला मिश्रीत, आळ्यायुक्त,गटारीचे पाणीपुरवठा,करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पाण्याच्या बाटली घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विषणू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांनाा निवेदन दिले आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या नाहीतर विष ध्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे 7/4/25 रोजी रोजी झोन नं ८ मध्ये समाविष्ठ असलेले कुचन नगर परिसरात पाणी पुरवठा होत असुन नळाला पाणी गटारीचे काळे पाणी, आळया युक्त पाणी, दुर्गधीयुक्त् वास येणारे पाणी अश्याप्रकारचा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत कारमपुरी महाराज यांनी मा, उपायुक्त रवी पवार साहेब, यांना संपर्क साधले असता पाणीपुरवठा माझ्या अखत्यारित येत नाही., तुम्ही श्री कारंजे साहेबांना संपर्क साधा असे सांगितले. त्यानंतर श्री कारंजे साहेबांना संपर्क साधले असता, विभागीय अधिकारी झोन क्र. ८ व त्या विभागाच्या पाणीपुरवठा अधिकारीकडे संपर्क साधा., असे उत्तर दिले आणि काही वेळेनंतर याठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी वर्ग आले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केले असता, नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी व आळया असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन, त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघुन गेले. म्हणजेच त्यांना ही दुर्गंधी युक्त पाणी पुरवठयाचे कारण समजले नाही. यावरून दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा बंद होण्यासाठी व पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे. तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करु शकतो., असे आम्हांस वाटते आणि त्वरीत कुचननगर परिसरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करा अशी मागणी करीत आहोत. तरी माननीयांनी वरील विषयाबाबत गंभीर दखल घेवून स्वच्छ पाणीपुरवठा करुन सहकार्य करावे., ही विनंती. असे नमूद करण्यात आले .
अन्यथा मनपा कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला
विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मानपा उपायुक्तांना निवेदन देणा-या शिष्टमंडळात यशोदा गुंडेटी , राधिका मिट्टा , पद्मा मॅकल , लक्ष्मीबाई इप्पा , रेखा आडकी , पल्लवी येमुल , कल्पना येमूल , विश्वनाथ राठोड , विठ्ठल कुराडकर , प्रसाद जगताप , रमेश चिलवेरी , श्रीनिवास बोगा , गुरुनाथ कोळी , प्रशांत जक्का , यांच्यासह कुचन नगर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login