सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

फडणवीसानंतर बावनकुळेही आ. सुभाष देशमुखांच्या निवासस्थानी; विविध विषयांवर झाली चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी अचानक भेट दिल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या या भेटीत सोलापुरातील विविध विषयांवर चर्चा झाली.
सोमवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात आले होते. रात्री सोलापुरात मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी थेट आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजीता चाकोते तसेच भाजप युवा नेते रोहन देशमुख, बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख उपस्थित होते. रोहन देशमुख यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले.
यानंतर बावनकुळे आणि आमदार देशमुख यांच्यात शहरातील प्रलंबित प्रश्न, महसूल खात्याशी संबंधित विषय तसेच आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी दौऱ्यावरून परतताना आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली होती. त्यावेळीही मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात बरीच गाजली होती. त्यानंतर आता महसूल मंत्री बावनकुळे यांनीही आमदार देशमुख यांची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel