लक्षद्वीपला फिरायला जायचंय? ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार नाही एण्ट्री, जाणून घ्या परमिटची प्रक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर देशभरात त्याची जोरदार चर्चा होत आहे. जर तुम्हालाही समुद्रकिनारा आवडत असेल तर लक्षद्वीप हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र याठिकाणी जाण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते.
या अत्यंत निसर्गरम्य द्वीपवर फिरण्यासाठी तुम्हाला एक एण्ट्री परमिट (Entry permit for Lakshadweep) घ्यावा लागेल. हा परमिट कसा मिळवला जातो आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा, याविषयी जाणून घेऊयात..
लक्षद्वीपचे स्थानिक रहिवासी आणि सरकारी अधिकाऱ्यांना सोडून सर्वांना या एण्ट्री परमिटची गरज असते. मग तुम्ही भारतीय नागरिक असो किंवा परदेशी.. प्रत्येकाला हे परमिट घ्यावं लागतं. जी व्यक्ती लक्षद्वीपची मूळ रहिवासी नसते, त्यांना या द्वीपवर प्रवेश करण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी आधी परमिट घ्यावं लागतं.
यासाठी आयडी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, वोटर आयडी इत्यादी, ट्रॅव्हल प्रूफ म्हणून फ्लाइट तिकिट किंवा बोट बुकिंग तिकिट, हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन, पासपोर्ट साइज फोटो आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ही कागदपत्रे लागतात.
लक्षद्वीप एण्ट्री परमिटसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. परमिट घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं हा सर्वांत सोपा आणि जलद गतीचा पर्याय आहे.
तुम्ही ePermit पोर्टल https://epermit.utl.gov.in/pages/signup वरून हा अर्ज करू शकता. या वेबसाइटवर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतील.
यानंतर तुम्हाला परमिट फी जमा करावी लागेल. तुमच्या डेस्टिनेशननुसार ही फी वेगवेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण कराल तेव्हा तुमची ट्रिप सुरू होण्याच्या 15 दिवस आधी तुम्हाला परमिट ई-मेलवर पाठवलं जाईल.
जर तुम्हाला ऑफलाइन परमिटसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हाला लक्षद्वीप एडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर https://www.lakshadweeptourism.com/contact.html जाऊन अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा कवरत्ती जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून हा अर्ज मिळवावा लागेल. हा अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.
ऑफलाइन प्रक्रियेत थोडा अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे लक्षद्वीप ट्रॅव्हल प्लॅन करण्याआधी तुम्हाला ही सर्व तयारी करून घ्यावी लागले. याअंतर्गत भारतीय नागरिकांना सर्वांत आधी आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यातून क्लीअरन्स सर्टिफिकेट घ्यावा लागतो. हे परमिट 30 दिवसांपर्यंत वैध असेल. यात तुम्ही ट्रॅव्हल एजंटचीही मदत घेऊ शकता.
Comments
-
Maruti Kangude24mआश्चर्य वाटत अहो भारतीय माणसाला घटनेने संचार स्वातंत्र्य दिलंय मग या ठिकाणी भारतीयांना परवानगी का घ्यायची का आता जम्मू काश्मीर निर्माण करताय.



