महाराष्ट्र

तुम्ही म्हणाल त्या नंबरवर खेळेन…; एका वाक्याने नशीब पालटलं, श्रेयसनं करून दाखवलं

२०११ ची वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बसला होता… सोबत असलेल्या मित्रांना त्याने तेव्हाच सांगितलं होतं की, मी एक दिवस भारतासाठी वर्ल्ड कप खेळेन अन् परवा त्याने याच वानखेडेवर शतक झळकावून १२ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं…

 

भारताचा युवा स्टार श्रेयस अय्यर याचा हा प्रवास सोपा नव्हता… त्यात खांद्याच्या दुखापतीने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागलेले. आधीच संघात उशिरा पदार्पणाची संधी मिळाली, त्यात दुखापतीने नजर लावली.. संघर्ष हा त्याच्या सोबतच प्रवास करताना दिसला, परंतु तरीही तो खचला नाही.. मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या रगारगात असलेला ‘खडूस’पणा त्याला ऊर्जा देत राहिला…

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया ज्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात होती, तो शोध श्रेयस अय्यरने संपवला. २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताने चार फलंदाज खेळवले आणि त्यांना मिळून २८.७च्या सरासरीने २५९ धावा करता आल्या होत्या. पण, श्रेयसने या वर्ल्ड कपमध्ये एकट्याने ५२६ धावा कुटल्या आहेत आणि त्याही ७५.१४च्या सरासरीने. वानखेडेवर त्याने वर्ल्ड कपमधील भारताकडून तिसरे जलद शतक झळकावले… पण, विराटच्या पन्नासाव्या ऐतिहासिक शतकामुळे अय्यरला विजयाचं हवं तेवढं श्रेय मिळाले नाही…

शिवाजी पार्क ते टीम इंडिया…

मुंबईकर श्रेयसचा इथवरचा प्रवास सोपा नक्की नव्हता… घरची परिस्थिती चांगली असली तरी संघर्ष कुणाला चुकलेला नाही… २०१८मध्येच त्याचे कसोटी संघात पदार्पण झाले असते, परंतु काही परिस्थितींमुळे त्यासाठी डिसेंबर २०२१ उजाडावे लागले. २०१९मध्येही चौथ्या क्रमांकासाठी त्याची चर्चा होतीच, परंतु तेथेही माशी शिंकली.. त्यात मागील दोन वर्षं तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. आंतरराष्ट्रीय सामने सोडाच, तो आयपीएलमध्येही खेळला नव्हता.. अशा परिस्थितीत वर्ल्ड कपसाठी त्याची निवड ही जोखीमच होती.

पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या श्रेयसवर टीकाही झाली. पण, राहुल द्रविड, रोहित शर्मा यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला… कोण काय बोलतंय याकडे तू दुर्लक्ष कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे त्यांनी श्रेयसला सांगितले आणि त्याचा ग्राफ बघा कसा उंचावला! २००३मध्ये त्याचे वडील संतोष यांनी त्याला शिवाजी पार्क जिमखान्यात नेले. प्रविण आम्रे, पद्माकर शिवलकर आणि संदेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तो शिकला… ११ वर्षीय श्रेयसमधील स्पार्क या तिघांनी ओळखला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login