सोलापूर अपघात

ब्रेकिंग : सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अप-घा-त…

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर बोरामणी गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची KA 38 FF 1212 क्रमांकाची बस आणि एक आयशर कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत १५ ते १८ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia