सोलापूर बातमीआरोग्यमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…. असंख्य नागरिकांनी घेतला लाभ जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम…

सोलापुर दि. 23 जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज रोजी शिवदासमय मंगल कार्यालय येथे सर्व रोग निदान तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व रोग मोफत निदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.
प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ गेली पाच वर्ष महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीदिनी समाज उपयोगी उपक्रम राबवीत असते ते कौतुकास्पद असल्याचे मत नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केले
सदर प्रसंगी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील उत्सव अध्यक्ष प्रसाद झुंजे ट्रस्टी कोषाध्यक्ष गणेश साखरे, नगरसेवक अविनाश पाटील,ज्ञानेश्वर कारभारी,संजय कणके, सुभाष बिराजदार, अमोल बिराजदार, गुरु शरण कोणापुरे,प्रसाद झुंजे, सिद्धाराम नागशेट्टी, जगदीश नालवार, शिवशरण साखरे, नितीन अलमेल,अविनाश भोळा, जगदीश होनराव
व सोलापुरातील विविध हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel