सोलापूर बातमी

सोलापूर – आमदार विजय देशमुख यांचा सर्व सामान्य महिलांकडून सत्कार….

राज्याच्या महायुती सरकारने परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांकरता आर्थिक योजना आणि सवलती देणारी योजना जाहीर केल्या नंतर, रविवारी नवी पेठ येथील वि रा पाटील पथ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या वतीने महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सर्वसामान्य महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला…..

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली नगरसेविका कल्पना कारभारी नगरसेविका ज्योती बंमगोंडे नगरसेविका वंदना गायकवाड विमल पुट्टा सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, किरण पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थ -संकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार, त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांन पर्यंत पोहचवणार असल्याची प्रताक्रिया व्यक्त केली

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel