देश - विदेश

शिवशाही बसमध्ये चालकाने घेतला गळफास…

नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये बस चालकाने पाठीमागच्या सीटवर आपल्या कमरेच्या करदोऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास सिन्नर – शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात ही घटना घडली.

प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवले

राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) असे मयत चालकाचे नाव आहे. ते नाशिकमधील दोनवडे येथील रहिवासी आहेत. राजू ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्ती जवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक निघून गेल्याचे समजते.

कारण समजू शकले नाही

रात्री १ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदेवस्ती जवळ आले. यावेळी बस चालक राजू ठुबे याने बसमध्ये पाठीमागच्या सीटवर हँडलला करदोऱ्याच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

आकस्मित मृत्यूची नोंद

गुरुवारी (दि.२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास सिन्नरचे आगार प्रमुख नेरकर यांच्यासह नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login