सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा शिष्यवृत्ती वाटप संपन्न संयम,सातत्य आणि जिद्द यशाचा मूलमंत्र – डॉ.शिंदे

आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. योग्य दिशेने अथक प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळते.संयम,सातत्य आणि जिद्द हा यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले. ते म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्तीचे वाटप करतेवेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक जमादार,युवा उद्योजक अमोल शिंदे हे उपस्थित होते.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, यश प्राप्त झाल्यावर आपण यशाची हवा डोक्यात जाऊ न देता मागे राहिलेल्या आपल्या बांधवांना हात देऊन त्यांच्या प्रगतीसाठीही हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षपदावरून बोलताना भालशंकर म्हणाले की, महापुरुषांची जयंती शिष्यवृत्ती सारख्या विधायक कार्यातून साजरी केली जात असून याचा फायदा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. सोलापूर साठी ही गौरवास्पद गोष्ट आहे.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जमादार म्हणाले की, कठीण परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा युवा वर्गाने करावी.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण रोख रुपये 25,000 /-सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सम्यक अकडमी चे मार्गदर्शक बुद्धजय भालशंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत मगर, भौरम्मा वाघमारे, साक्षी सोनकांबळे,विजय पल्लू यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel